अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या अध्यक्षपदी नंदकुमार देशपांडे तर उपाध्यक्षपदी प्रशांत माळवदे

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची बैठक जिल्हाध्यक्ष शशिकांत  हरीदास यांचे अध्यक्षतेखाली ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष सरदेशमुख, दीपक इरकल, प्रांत सहसंघटक विनोद भरते, प्रांत सदस्य जिल्हा उपाध्यक्ष विनय उपाध्ये जिल्हा सचिव सुहास निकते यांचे उपस्थितीत  शहर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात येऊन अध्यक्षपदी नंदकुमार देशपांडे. उपाध्यक्षपदी भाळवणी येथील पत्रकारिता क्षेत्रात ग्रामीण भागात कार्यरत असलेले प्रशांत माळवदे यांची निवड करण्यात आली.
           या मीटिंगच्या प्रारंभी ओझर येथे झालेल्या कार्यकर्ता शिबिराची माहिती शशिकांत  हरीदास जिल्हाध्यक्ष व दीपक इरकल यांनी दिली यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. सचिवपदी महेश भोसले सहसचिव आझाद अल्लापुरकर कोषाध्यक्ष सागर शिंदे यांच्या पदाच्या निवडी घोषित केल्यानंतर कार्यकारणी सदस्य म्हणून धनंजय पंडी, संजय खंडेलवार, सतीश निपाणकर, मंगेश देशपांडे, शशिकांत सुगंधी, इंद्रजीत फडे, शाम तापडिया, शहाजी जाधव, शहाजी ठोंबरे आदींचा यामध्ये समावेश करण्यात आला.
         या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शशिकांत हरिदास, विनय उपाध्ये दीपक इरकल यांचे हस्ते करण्यात आला.
            या बैठकीत सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त तालुकास्तरावर शहर स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे, नवीन सदस्य झाले त्यांच्यासाठी ग्राहक पंचायत या विषयावर अभ्यास वर्ग आयोजित करणे, नवीन सभासद नोंदणी आदि कार्यक्रम ठरवण्यात आले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)