माढा सांस्कृतिक कार्यक्रमास माढाकरांचा उदंड, प्रतिसाद गर्दीचा उच्चांक
माढात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या स्मारकासाठी आ.अभिजीत पाटील यांच्याकडून ११लाख वर्गणी
माढा (प्रतिनिधी) - मतदारसंघाच्या विकासाचे जे व्हिजन समोर ठेवले होते. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आमदारांचे काम म्हणजे निधी आणि आमदार फंड इतकंच मर्यादित न मानता गेल्या एक वर्षाच्या कारकीर्दीत राज्यातील अनेक प्रश्न विधानसभेत उपस्थित केले. विधानसभेत कोणतेही वक्तव्य केले तर ते पटलावर येते. त्याचा पाठपुरावा केल्यास ते प्रश्न सुटतात. असेच सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण केले एक वर्षाच्या कार्यकाळात काम केले असल्याचे मत आमदार अभिजित पाटील यांनी व्यक्त केले.
विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने माढा शहरात आयोजित कृषी व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. आमदार अभिजीत पाटील पुढे म्हणाले, मतदार संघातील लोकांनी विधानसभेत जाण्याची संधी दिली. विधानसभेत अधिवेशनात मी प्रत्येक दिवशी हजर राहिलो. प्रत्येक दिवशी शिकायला मिळाले. तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी, औचित्याचा मुद्दा, २९३ वर चर्चा, १९२ काय आहे, ९४ वरची चर्चा, १०१ काय आहे, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
विधानसभेत सामान्यांशी निगडित एसटी पार्सल, दुधामधील भेसळ, ऑनलाईन गेम, यावरचे प्रश्न विचारले, ते सर्व प्रश्न मार्गी लागले हे सामान्य जनतेचे प्रश्नच होते. मी आमदार होण्यापूर्वी आमदारांचे काम म्हणजे निधी व आमदार फंड इतकेच होते. पण मी नुसता माढा विधानसभेचा आमदार नसून राज्याच्या विधानसभेतील लोकांचा प्रतिनिधी म्हणून सामान्यांचे प्रश्न उपस्थित करण्याचे काम केले. निवडणूक लढवताना जे व्हिजन लोकांसमोर ठेवले. त्याच्यावर काम करणे सुरू असून काही कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यापैकी माढा शहरात भव्य शिवस्मारक उभारणे यासाठी जागेची मोजणी झाली. स्मारकासाठी दहा कोटींचा निधी मागणी केला असून त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. हा सर्व निधी सुशोभीकरणासाठी व स्मारकासाठी असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी एक समिती गठीत केली असून त्यासाठी ११ लाख रुपयांची वर्गणी मी स्वतः देणार असून सर्वांनी एका कामी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
महापूर व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील एक लाख चार हजार शेतकऱ्यांपैकी ९८ हजार शेतकरी हे अतिवृष्टीत लाभासाठी पात्र ठरले आहेत. या कामे प्रशासकीय यंत्रणेच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभा राहण्याची भूमिका घेतली.मतदारसंघातील अनेक लोकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली आहे. त्यांचे सोबत असले पाहिजे, ही माझी प्रामुख्याने भूमिका राहिली आहे.
सलग चार दिवस माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे हास्यविर भाऊ कदम, महागायक आनंद शिंदे, फोक प्रबोधन, डॉ.निलेश साबळे अशा महाराष्ट्रातील दिग्गज कलाकारांना माढा नगरीत आणून आमदार अभिजीत पाटील यांनी माढा मतदारसंघातील नागरिकांची मने जिंकली. दरवर्षी माढा फेस्टिवल करण्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी नमूद केले.
---------------------------------------------------
मी यशवंतराव यांच्या विचाराचा पाईक
काम करताना मी यशवंतराव चव्हाण यांना डोळ्यासमोर ठेवून काम करतो. शेती करायची असल्यास शेतात जा, शेत तुम्हाला शेती करायला शिकवेल, तसेच समाजकार्य करायचे असल्यास समाजात जा समाज समाज कार्य करायला शिकवेल लोकहिताचे समाजात चर्चा करा त्यातून तुम्हाला लोकांचे प्रश्न समजतील व या सर्वातूनच राजकारण करायला शिकलो. यशवंतराव चव्हाण यांचा संदर्भ देत अभिजित पाटील यांनी वक्तव्य केल्याने त्यांच्या या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट झाली.
---------------------------------------------------

