पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलाच रंग भरला असून प्रचारात खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात चुरस पाहवयास मिळत आहे.
तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ. सौ. प्रणिता भगीरथ भालके यांनी पंढरपूर शहरातील विविध भागात प्रचार फेरीत आघाडी घेतली आहे. प्रचार फेरीत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक उमेदवार तसेच नागरिक, मतदार, भालके प्रेमी नागरीक, युवा युवती यांचा मोठा सहभाग दिसून येत आहे.
तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारास विविध सामाजिक संघटना तसेच कार्यकर्ते नागरिक यांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष मोठ्या बहुमताने विजयी होणार याची चाहूल दिसून येत आहे.
मतदारांना आव्हान करताना त्यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना डॉ. प्रणिता भालके म्हणाल्या की- पंढरपूर नगरपरिषद निवडणूक अतितटीची असुन सामान्य जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. मी पंढरपूर शहरातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सर्वांना सोबत घेऊन करील.
तिर्थक्षेत्र आघाडीस सर्व सामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

