खासदार प्रणिती शिंदे यांच्या पदयात्रेत महिलांची तुफान गर्दी

0


          पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमदेवार डॉ. प्रणिता भालके यांच्या प्रचारार्थ सोलापूर लोकसभा खासदार प्रणिताताई शिंदे यांनी मतदार संघात पदयात्रा काढण्यात  आली. यावेळी त्यांनी कडबेगल्ली, दाळेगल्ली, डोंबे गल्ली, नवी पेठे, कुंभार गल्ली, अनिलनगर, अनिल नगर, नाईक नगर कळये परिसरात काढलेल्या पदयात्रामध्ये मोठ्या संख्येने
महीला, नागरीक पदाधिकारी मतदार समभागी झाले होते. प्रभाग क्रमांक 2,अ मधील उमेदवार प्रसाद प्रकाश कळशे व,,ब, मधील उमेदवार प्रणिता किरण घाडगे यांच्यासह प्रभाग क्रमांक,,3 मधील उमेदवारअ. सौ. राजश्री प्रताप गंगेकर ब. अक्षय प्रताप गंगोकर यांच्या प्रभागात पदयात्रा काढण्यात आली.  या पदयात्रेमध्ये पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, किरण घाडगे यांच्यासह या दोन्ही प्रभागातील अक्षय ढाळे, विकास मोरे, प्रथमेश चव्हाण, राहुल सगरे, सुनिल आसबे, रंगनाथ लावंड, संकेत घाडगे, आदी तरुण कार्यकर्ते मतदार नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते.


           पदयात्रेत महिलांनी प्रचारासाठी विशेष आघाडी घेतली आहे. घरोघरी प्रत्यक्ष मतदारांना भेटून पंढरपूरच्या शाश्वत विकासासाठी होणाऱ्या विकास कामासंदर्भात, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धतीबद्दल, भविष्यातील विविध योजनेबद्दल, तसेच सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.


          या प्रचाराफेरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांचे आधुनिक विचार, शहर विकासासाठीची नवनिर्मिती, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धती प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचलेली दिसत आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भालके बाजी मारणार.!


           शांत व संयमी व्यक्तिमत्व असणारे हे निश्चितपणे नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनेकांनी व्यक्त केला. पंढरपूर शहरासाठी विविध प्रकारच्या नवनवीन संकल्पना व त्यातून शहराचे आधुनिकीकरण हा यांचा विचार हळूहळू पंढरपूर शहराबरोबर उपनगरापर्यंत पोहोचत आहे. समाजातल्या उपनगरापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्या घटकाला समजून घेऊन न्याय देण्याची भूमिका ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. येणाऱ्या निवडणुकीत वेगवेगळे पक्ष विविध पद्धतीने लढत असताना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भालके म्हणून निवडणूक लढवणारे यांच्याकडे सर्वसामान्य मतदारांचे विशेष लक्ष आहे ही बाब आता उघड होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)