भाजपा २२, तिर्थक्षेत्र विकास आघाडी ११, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ४, अपक्ष १
पंढरपूर दि. 21 (प्रतिनिधी) - पंढरपूरच्या नगराध्यक्षपदी डॉ. प्रणिता भालके या विक्रमी मतांनी विजयी झाल्या असून त्यांना एकुण ३४९६० मते मिळाली असुन १११३६ मतांचे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. याचे श्रेय पंढरपूरच्या स्वाभिमानी जनतेला देत असल्याचे माध्यम प्रतिनिधिंशी बोलताना त्यांनी सांगितले. तर भारतीय जनता पार्टीचे २२ नगरसेवक विजय झाले असून तिर्थक्षेत्र विकास आघाडी ११, पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ४, अपक्ष १ असा निवडणूक निकाल जाहीर झाला आहे.
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत नगराध्यक्ष, नगरसेवक यांची मतमोजणी पंढरपूर शासकीय धन्य गोदाम येथे पोलिस प्रशासनाच्या कडेकोट बंदोबस्तात पार पडली. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वसामान्य नागरिक तसेच मतदारांना लागली होती.
निवडणूक रिंगणात विविध राजकीय पक्षांचे व विविध आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरले होते. भाजपा व तिर्थक्षेत्र विकास आघाडी यांच्यातच काटे की टक्कर पहावयास मिळाली. यामुळे पंढरपूरची निवडणूक चुरशीची झाल्याचे दिसून आली; तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती तर विरोधकांच्या उमेदवारांची अस्तित्वाची लढाई असलेचे चित्र दिसून येत होते.
पंढरपुर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत १८ प्रभागात १३३ नगरसेवक उमेदवार तर नगराध्यक्षा पदासाठी ५ उमेदवार निवडून रिंगणात उतरले होते.
प्रभाव ५ अ मधुन भाजपाच्या उमेदवार कुसुम परचंडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग ५ ब मधुन अपक्ष उमेदवार अटीतटीच्या लढतीत ओंकार अभय जोशी हे विजयी झाले आहेत.

