पुराची व्यथा मांडताना आमदार अभिजीत पाटील गहिवरले
माढा तालुक्यातील सीना नदीच्या पुरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची तातडीची आवश्यकता
माढा (प्रतिनिधी) - माढा तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि भीषण पुरपरिस्थितीमुळे अभूतपूर्व संकट ओढवले होते. सीना नदीला जवळपास ९०० क्युसेस पाण्याची क्षमता असताना एका रात्रीत तब्बल २ लाख १२ हजार क्युसेस पाणी नदीपात्रात आले. यामुळे माढा तालुक्यातील १७ गावे पूर्णतः जलमय झाली. अनेकांच्या घरांवर २० ते २५ फूट पाणी आले आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. गावाच्या गावात उध्वस्त झाले.
याच दरम्यान माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना नदीच्या पुराची पाहणी केली. अतिशय भयान परिस्थितीमध्ये माढा तालुक्यातील नागरिकांनी या संकटाचा सामना केला.
माढा तालुक्यावर १०० वर्षांत न आलेला असा महापूर ओढावला आहे. या संकटातून नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शासनाने जाहीर केलेले पॅकेज अपुरे असून, माढा तालुक्यास सोलापूर जिल्ह्याला स्वतंत्र विशेष पॅकेज देणे अत्यावश्यक आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माढा तालुक्याचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी पोटतिडकीने माढा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि महापुरामध्ये विस्कटलेला संसार उभा राहण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी मायबाप सरकारकडे पोटतिडिकीने विशेष पॅकेजची मागणी केली.
---------------------------------------------------
मी आमदार म्हणून गेल्या दहा दिवसांपासून सतत नागरिकांच्या सोबत राहून मदतीचा हात दिला परंतू मायबाप सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. ती लवकर करावी यासाठी मी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत राहणार आहे.
- आमदार अभिजीत पाटील,
माढा विधानसभा मतदारसंघ
---------------------------------------------------

