खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात महारोग्य शिबिर संपन्न

0
५१० रुग्णांनी नोंदविला सहभाग

            माढा (प्रतिनिधी) - देशाचे नेते, पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून माढा ग्रामीण रुग्णालय येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. 

             याशिबिरात हृदयरोग तपासणी, मधुमेह (Diabetes) व रक्तदाब (BP) तपासणी, स्त्रीरोग व प्रसूतीपूर्व तपासणी, बालरोग तपासणी व समुपदेशन,  त्वचा रोग आणि सामान्य औषधोपचार, मोतीबिंदू व नेत्र तपासणी, इत्यादी प्रकारच्या तपासण्या घेण्यात आल्या या तपासण्याबरोबरच औषधे मोफत देण्यात आली या शिबिरात ५१० रुग्णांनी सहभाग नोंदवला.

            आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी इतर योजनेतून जवळजवळ ३ कोटी रुपयांची सहाय्यता रुग्णांना मिळाली याबाबत सर्व उपस्थितांनी आमदार साहेबांचे आभार मानले.

          यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, विनंती कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, संजय पाटील, आनंद कानडे, हरिभाऊ रणदिवे सर, बापूसाहेब जाधव, राम मस्के, ऋषिकेश तांबिले, आबासाहेब साठे, बापू तांबिले, सावली बंगाळे, अश्विनी लोकरे, वैद्यकीय अधिष्ठता डॉ.मेमाणे, डॉ.अमित भोसले, डॉ.रणजीत ढोले, डॉ. सुजित गायकवाड, डॉ.पांडुरंग जगताप, डॉ. आलेकर, डॉ. बांगर सर्व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉक्टर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.

---------------------------------------------------

            आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जन्मजात बहिरेपणा असणाऱ्या मुलांची तपासणी करण्यासाठी शिशुकर्णदोष कीट माढा ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध झाले आहे याचा फायदा माढा तालुक्यातील नवजात शिशु, लहान बालकांना होईल व त्यांचा बहिरेपणा दूर करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात येईल याबद्दल वैद्यकीय अधिष्ठता डॉ. मेमाने यांनी आभार मानले.
---------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)