पंढरपूर (प्रतिनिधी) - महावितरणने पंढरपूर परिसरात ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू करावीत अशी मागणी कार्यकारी अभियंता, पंढरपूर यांचेकडे समक्ष भेटून केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
सध्या सर्व प्रकारच्या वाहन निर्मितीत ईलेक्ट्रीक वाहने मोठ्या प्रमाणात तयार होत असल्याने वाहतुक क्षेत्रात ई-वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. इंधनाचे वाढते भाव व प्रदुषण रोखण्यासाठी भविष्यात त्याचा वापर वाढणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथेही देशाच्या विविध भागातुन येणाऱ्या ई-वाहनांची संख्या मोठी असल्याने परिसरात चार्जिंग सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आलेल्या भाविकांना अडचणीचे होत आहे.
त्यासाठी पंढरपूर परिसरात चार्जिंग स्टेशन सुरू होण्याची आवश्यकता आहे. यासाठी महावितरण विभागाने पंढरपूर शहर परिसरात १) कार्यकारी अभियंता कार्यालय परिसर,लिंक रोड २) सांगोला रोड, सब स्टेशन (पारेषण कार्यालय परिसरात), ३) भंडीशेगाव सब स्टेशन ४) पद्मावती सबस्टेशन परिसर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करावीत व ग्राहकांना आपली वेगळी सेवा उपलब्ध करून द्यावी.
या मागणीची प्राधान्याने कार्यवाही करण्याची मागणी अधिक्षक अभियंता, सोलापूर यांचेकडे अ. भा. ग्राहक पंचायतीचे प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख, प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते, पांडुरंग अल्लापूरकर यांनी केली आहे.

