पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना बेस्ट डीटेक्शन अवॉर्ड

0
गुन्ह्याची उकल उत्तम पद्धतीने केल्याने "बेस्ट डीटेक्शन अवॉर्ड"

               पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुका पोलिसांनी दरोड्याच्या  गुन्ह्यात तीन आरोपींना  योग्य दिशेने तपास करीत जेरबंद केल्याने तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह सहकाऱ्यांना "बेस्ट डीटेक्शन अवॉर्ड" ने सन्मानित करण्यात आले आहे.

               मध्य प्रदेश पासिंगची पिकप गाडी क्रमांक एम पी ०९ एस ३०१० या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लाथा बुक्क्याने मारहाण करून पिकप गाडी जबरदस्तीने चोरून  एकूण ११ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेले होते. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी गोविंद लिंबा पवार वय २३ वर्ष राहणार अंकोली तालुका मोहोळ, निबालअहमद शेख वय २१ वर्ष राहणार चिंचोली तालुका पंढरपूर  संच्या मिटकरी वय ३२ राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकप गाडी  क्रमांक एम पी  ०९ एस ३०१०  एकूण किंमत रुपये ११ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केली होती.

                सदर गुन्हा घडले पासून काही तासात आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,  अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर   उपविभागीय पोलीस अधिकारी  अर्जुन भोसले  यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  तय्यब मुजावर पीएसआय  भोसले   हेडकॉन्स्टेबल गजानन माळी , विनायक क्षीरसागर, ए एस आय तोंडले , हेडकॉन्स्टेबल रोकडे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी पोलीस कॉन्स्टेबल आवटी यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)