श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिरास माघी यात्रेत 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न

0
         पंढरपूर दि.14 :- माघ यात्रा कालावधीत भक्तांनी  श्रीविठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचे दान केले तसेच  सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले. मंदीर समितीला  लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पुजा, फोटो विक्री आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून   मंदिरे समितीस 3 कोटी 3 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

            माघ यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आले होते. माघ शुध्द 1 (दिनांक 30 जानेवारी) ते माघ शुध्द 15 (दिनांक 12 फेब्रुवारी) या कालावधीत  भाविकांनी  श्रींच्या चरणाजवळ 3233420 रुपये अर्पण,  8034128 रुपये देणगी,  4081000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 3683969 रुपये भक्तनिवास , 888800 पुजेच्या माध्यमातून,  8648152  रुपये हुंडीपेटी , 1039707 रुपये  सोने-चांदी अर्पण, तसेच फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन आदी माध्यमातून 697640 रुपये  उत्पन्न प्राप्त झाले आहे. 

           मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 3247774 रुपये अर्पण , 8902798 रुपये देणगी, लाडूप्रसाद विक्रीतून 3944000,  भक्तनिवास 5090721 रुपये, 728600 रुपये पुजेच्या माध्यमातून,  11598739 रुपये हुंडीपेटीतून, 515805 रुपयाचे सोने-चांदीचे दागिणे अर्पण, तसेच  फोटो, महावस्त्रे, शेणखत, गोमुत्र, मोबाईल लॉकर, जमा पावती, चंदन  आदी माध्यमातून 994082  रुपये प्राप्त झाले होते.

         सन 2024 च्या माघी यात्रेत रू.35022519/- व या वर्षीच्या यात्रेत रू.30306816/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू.4715703/- इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सुमारे 4 लाख 50 हजार लाडूप्रसादाची विक्री झाली असून, सुमारे 52 ग्रॅम सोने व 6 किलो चांदीच्या वस्तू प्राप्त झालेल्या आहेत. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असेही यावेळी श्री. श्रोत्री यांनी सांगीतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)