पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे श्री विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर यांचे वतीने अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला दि. 15 व 17 फेब्रुवारी 2025 अखेर संपन्न होणार आहे.
दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता श्री. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता राहुलजी गिरी यांचे व्याख्यान होणार असून दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता शाहीर डॉक्टर देवानंद माळी यांचा पोवाड्याचा कार्यक्रम शिवतीर्थावर संपन्न होणार आहे.
तरी सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल प्रतिष्ठान पंढरपूर यांचे वतीने करण्यात येत आहे.

