प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त १०४५ रक्तदात्यांचे रक्तदान

0
        सांगोला (प्रतिनिधी) - रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान समजून २३ मे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष, लायन्स क्लब माजी प्रांतपाल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लब सांगोला आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये २० मे लोणविरे १३५,२२ मे नाझरा २२५ व २३ मे २०२५  कोळा येथे १४० व सांगोला ५४५ असे एकूण १०४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे अनमोल कार्य केले.
         सांगोला येथील शिबिराच्या सुरुवातीला कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास डॉ. शैलेश डोंबे यांचे हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात  आला. त्यानंतर सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड उदयबापू घोंगडे, डॉ.शैलेश डोंबे, माजी नगराध्यक्ष सुहास होनराव, उद्योगपती विलास क्षीरसागर, कॅबिनेट ऑफिसर  सी.ए.उत्तम बनकर, संस्था सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेष आटपाडीकर, कॅबिनेट ऑफिसर ब्लड डोनेशन कॅम्प ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लबचे सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव यांच्या उपस्थितीत फीत कापून व श्रीफळ वाढवून शिबिराचे उद्घाटन झाले. 
         या शिबिरासाठी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सदस्य ॲड विजयसिंह चव्हाण, दिगंबर जगताप, विद्यामंदिर परिवारातील प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, लायन्स क्लब सांगोला पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       सदर शिबिराला सांगोला विधानसभेचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, लायन्स क्लब सांगोला संचालक गिरीशभाऊ नष्टे, उद्योगपती बाळासाहेब झपके, डॉ.सौ.जीवनमुक्ती डोंबे, नियत क्षेत्र वनअधिकारी सांगोला वनिता इंगोले, डॉ.विनित दिघे, डॉ.अनिकेत नवत्रे यांनी भेट दिली.
          या शिबिरासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला, सिद्धेश्वर ब्लड बैंक सोलापूर, एम.एस. ब्लड बँक सांगली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
      उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन  कॅबिनेट ऑफिसर  ला.प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांनी केले. तर समारोप कार्यक्रमामध्ये शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदाते उपलब्ध करून  रक्तदान केल्याबद्दल प्रा.नवनाथ बंडगर, प्रा.मोहन भोसले, राजेंद्र ढोले, सचिन ढोले, मिनाक्षी बिराजदार यांचा मान्यवरांच्या  हस्ते सन्मान करण्यात आला.व शेवटी सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड यांनी विद्यामंदिर परिवार व लायन्स क्लबच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे अंतःकरण पूर्वक आभार मानले. 

---------------------------------------------------
        प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या आचारविचारामागील तेज, तत्व व कार्यावर, लोकांचे अपार प्रेम असल्यामुळेच २३ मे त्यांचे वाढदिवसानिमित  दरवर्षी शेकडो रक्तदाते रक्तदान करतात. यावर्षी  लोणविरे १३५, नाझरा २२५  व दिवसभर पाऊस सुरू असतानाही कोळा येथे १४० व सांगोला येथे  ५४५ असे एकूण १०४५ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेच्या कल्याणाचे मौलिक कार्य केले.
---------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)