म.सा.प.,नगर वाचन मंदिर, लायन्स क्लब, रोटरी क्लब व अर्बन बँक सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) - महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सांगोला, नगर वाचन मंदिर सांगोला, लायन्स क्लब सांगोला, रोटरी क्लब सांगोला व अर्बन को-ऑप बँक सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा. सांगोला येथील अर्बन को-ऑप. बँक सभागृह मिरज रोड सांगोला येथे सांगोला तालुक्यातील निमंत्रित कवी/ कवयित्री यांचे कविसंमेलन संपन्न होणार आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्री.रं.ता.चोरमुले (जुनोनी/मुंबई) तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अविनाश सांगोलेकर (सांगोला/पुणे ) उपस्थित राहणार आहेत. तसेच या कविसंमेलनामध्ये शिवाजी बंडगर, राधिका प्रेमसंस्कार, तानाजी वाघमारे, साबळे गुरुजी, ना.मा.कांबळे, संतोष जगताप, ॲड उदय दौंडे, दमयंती कुलकर्णी, पुष्पलता मिसाळ, सुशिला नांगरे-पाटील, योजना मोहिते, मनीषा ठोंबरे, हर्षदा गुळमिरे, सुवर्णा तेली, अनिल केंगार, गौसपाक मुलाणी, गीता गुळमिरे, आश्लेषा मोदी, सुप्रिया कांबळे, जान्हवी सावंत, सीमा गायकवाड, सुरेखा कुलकर्णी, जयश्री पाटील, तेजश्री बाबर, प्रज्ञा देशपांडे, विदया शिर्के, सावित्री बाबर, बशीर तांबोळी व सूत्रसंचालक सुनील जवंजाळ हे निमंत्रित कवी/ कवयित्री कविता सादर करणार आहेत.
तरी काव्यानंदासाठी रसिक श्रोते यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागतोत्सुक म.सा.प.,नगर वाचन मंदिर अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला अर्बन बँकेचे संस्थापक चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विकास देशपांडे, म.सा.प.प्रमुख कार्यवाह व सांगोला तालुका कविसंमेलन समन्वयक प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले आहे.

