पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनिय कामगीरी

0
पंढरपुर शहरातील खत विक्री करणारे दुकानातून चोरीस गेलेले २,००,०००/- रू बियाने पोलीसांनी केले जप्त

             पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत शेती उपयोगी असणारे खत, बियाणे व औषधे विक्री करणारे दुकानामधुन दिनांक ३०/०५/२०२५ रोजी मका व कांद्याचे बियाची चोरी झालेली असल्याने पंढरपुर शहर पोलीस ठाणेस गु.र.नं. ३९४/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे दिनांक १४/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर चोरी करणाऱ्या आरोपींची सी.सी.टी. व्ही. फुटेज प्राप्त करून घेवुन अनेक ठिकाणीचे सी. सी. टी. व्ही कॅमेरे चेक करून आरोपी हे कोठे राहणेस आहेत व सध्या त्यांचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेतली असता ते सध्या घरी राहत नाहीत परंतु सदर आरोपी हे पेरणी सुरू झाली की, अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या चोऱ्या करतात अशी माहिती प्राप्त झाल्याने त्या अनुषंगाने गस्त करण्यात आली होती.
         दिनांक १४/०६/२०२५ रोजी २१:०० वा सुमारास दोन संशयीत इसम मोटार सायकली वरून मका व कांद्याचे बियाने निम्या किमतीमध्ये विक्री करण्या करीता पंढरपुर शहरामध्ये फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांना मोटारासायकली सह ताब्यात घेवुन पोलीस ठाणेस आणुन विश्वासत घेवुन सदर बियाने बाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. तसेच त्यांनी लातुर, धाराशिव व इतर ठिकाणी गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. सदर आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला मुद्देमाल खालील प्रमाणे -

        १) १,००,०००/- रु किंमतीचे पंचगंगा कंपनीचे दोन पेट्या प्रत्येकी ५० हजार रु किमतीचे कांदा बियाणे. २) १,००,०००/- रु किंमतीचे अॅडव्हॉटा कंपनीचे पाच पोती प्रत्येकी २० हजार रु किमतीचे मका बियाणे  असा एकुण २,००,०००/- रू किंमतीचा मका व कांदा बियाने जप्त करण्यात आले आहे.

         सदरची कामगीरीही मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे  विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोहेका सिरमा गोडसे, पोहेकॉ प्रसाद औटी, पोहेकॉ सचिन हेंबाडे, पोहेकॉ  विठ्ठल विभुते, पोशि निलेश कांबळे, पोशि शहाजी मंडले, पोशि समाधान माने, पोशि बजिरंग बिचुकले तसेच सायबर पोलीस ठाणे सोलापुर ग्रामीणचे पोशि रतन जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)