चैतन्य विद्यालयामध्ये नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

0
गुलाब पुष्प व मोफत पुस्तके वाटप करून उत्साहात साजरा...

           निरानरसिंहपुर (प्रतिनिधी) - येथील चैतन्य विद्यालय व श्री सु गो दंडवते कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2025 -26 शैक्षणिक वर्षासाठी नवीन विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पे व इ.5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना देऊन प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी इयत्ता आठवी व इतर वर्गातील नवीन विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.
        सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह श्रीकांत दंडवते, खजिनदार मगनदास क्षीरसागर, संचालक शामराज दंडवते, माजी मुख्याध्यापक व प्रशाला समितीचे अध्यक्ष धनंजय दुनाखे उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटली व गुलाबाची फुले देऊन सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. त्याचबरोबर सर्व पालक बंधू यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. त्यांनाही या शाळेतील नवीन शैक्षणिक धोरण, शाळेची शिस्त शाळेतले सर्व उपक्रम याची माहिती मा. मुख्याध्यापक  गोरख लोखंडे सर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख लावंड सर यांनी केले व  पडळकर सर यांनी आभार व्यक्त केले. विद्यार्थांच्या चेहरे आनंदाने फुलून गेले होते.
         शाळा ही सुखाची सरीता,.. ज्ञानाची अखंड गंगा,.. व ..भाग्याची देवता आहे.. याची प्रचिती आली.  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर वर्गाचे संस्था पदाधिकारी यांनी  इ.10 चा निकाल चांगला लागले बद्दल अभिनंदन व कौतुक केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)