आरोपींकडुन ५ लाख ६८ हजार रूपये किंमतीच्या एकुण ९ मोटारसायकली जप्त
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगीरी
पंढरपूर (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसापासून पंढरपूर शहर व परिसरातून दुचाकी मोटरसायकलची चोरी मोठ्या प्रमाणात होत होती. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सुमारे आठ दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल झाले असल्याने आरोपीचा माग घेण्यासाठी विविध ठिकाणी पदके पाठवून शोध मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये सोलापूर व पुणे जिल्ह्यातील सुमारे पाच आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ मोटरसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पंढरपूर शहर पोलीस ठाणे हददीत तसेच पंढरपूर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, व शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपूर शहर व परिसरातील ज्या ठिकाणी मोटार सायकल चोरी जाणेचे प्रमाण वाढले होते. अशा ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवून गोपनीय बातमीदार यांचे मार्फत मोटार सायकली चोरीबाबतची माहिती काढणेचे काम सुरू असताना गोपनीय बातमीदाराकडुन एक बातमी मिळाली की पंढरपूर शहरामध्ये बाहेर गावावरून काही आरोपी चोरी करण्या करीता येत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवल्यानंतर यामध्ये गणेश बाळासोा जाधव रा. जाधववाडी ता. माळशिरस जि. सोलापूर, विकास महादेव पवार रा. व्हावीरूई ता. इंदापूर जि. पुणे सध्या वाडी नं. २ माळशिरस जि. सोलापूर, सुरज लाला पवार रा. वालचंदनगर रोड कळंब ता. इंदापूर, अतुल बाळु तुपे रा. इंदिरा नगर कळंब ता. इंदापूर जि. पुणे, ओंकार आनंद वाघमोडे रा. ६१ फाटा माळशिरस जि. सोलापूर अशा पाच आरोपींना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांचेकडून एकुण ०८ गुन्हयाची कबुली त्यांनी दिली आहे. सदर आरोपींकडुन गुन्ह्याचा कौशल्यपुर्ण सखोल तपास केला असता आरोपींनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आठ गुन्ह्यांमध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल असलेले भाग ५ गुरनं ४७८/२०२४ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२), गुरनं २३/२०२५ भा.न्या. सं.२०२३ चे कलम ३०३(२), गुरनं २५/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम
३०३(२), गुरनं ३१३/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे, गुरनं ४१८/२०२५ भा.न्या. सं.२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे, गुरनं ४२०/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२), गुरनं ४२१/२०२५ भा.न्या. सं.२०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे, गुरनं ४२१/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्हे केल्याचे कबूली दिली आहे. ]
सदरची कामगीरी ही पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ. अर्जुन भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोह पाटील, पोह सिरमा गोडसे, पोह प्रसाद औटी, पोह सचिन हेंबाडे, पोह विठ्ठल विभुते, पोका कपिल माने, पोकों निलेश कांबळे, पोशि शहाजी मंडले, पोशि समाधान माने, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, पोकॉ धनाजी मुटकुळे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीणचे पोकॉ रतन जाधव यांनी केली आहे.

