सुवर्ण कलशारोहण संकल्पात नित्यदर्शन भक्तगणांचा सहभाग

0
माऊलींच्या संजीवन समाधी मंदीराच्या शिखरावर 11 किलो सुवर्णाचे कलशारोहण 
            श्रीक्षेत्र आळंदी देवाची जि. पुणे (प्रतिनिधी) - श्री..श्री..श्री.. संतश्रेष्ठ ज्ञानियाचे राजे श्रीज्ञानेश्वर महाराज यांचे सप्तशतकोतर सुवर्ण महोत्सवी (750  व्या) जयंती वर्षानिमित्त श्रीसंत ज्ञानोबारायांचा 750 वा जयंती महोत्सव दि.15/08/2025 रोजी महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर सर्वत्र साजरा केला जाणार आहे.
           या शुभदिनाचे औचित्य साधुन लोकसहभाग व लोकवर्गणीतून माऊलींच्या संजीवन समाधी मंदीराच्या शिखरावर 11 किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा 
संस्थान कमिटीने संकल्प केला आहे. या सुवर्ण कलशारोहणचे साक्षीदार होण्याचे भाग्य पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर नित्यदर्शन भक्तगण यांना मिळणार आहे.  नित्यदर्शन भक्तांनी सर्वांनी मिळून यथाशक्ती सहभाग घेत  67 भक्तगण यांनी मिळुन देणगी स्वरुपात 71001/- रू.
जमवुन काल दि.10/08/2025 रविवार रोजी आळंदी देवाची येथे जावुन श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी देवाची आळंदी येथील संस्थेचे प्रमुख विश्वस्त डॉ. ह.भ.प. भावार्थ रामचंद्र देखणे (महाराज) विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख यांना 71001/- रु. रोख रक्कम प्रदान करण्यात आले.
           या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व हा उपक्रम राबवण्यासाठी नित्यदर्शन भक्तगण पंढरपूर यांचे  अनमोल सहकार्याने या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभले व यांच्या सहकार्याने हा भुतोना भविष्यती उपक्रम पार पडला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)