मा.आ. प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनीना गणवेश व वह्या वाटप

0
वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात विविध स्तुत्य उपक्रम...
          पंढरपूर (प्रतिनिधी) - 
जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पंढरपुरचे माजी नगराध्यक्ष कै. नारायणराव धोत्रे यांचे चिरंजीव दत्तात्रय धोत्रे व धोत्रे परिवाराच्यावतीने पंढरपुरातील "मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेत" 280 गरजू विद्यार्थ्यांनीना गणवेश व एक डझन वह्या वाटप करण्यात आले. 

           त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव अकॅडमीचे संचालक  मंदार केसकर होते‌. मुख्याध्यापक विजय वेरुळकर  यांनी प्रशालेची  माहिती व कार्याची ओळख करून दिली. संस्थेचे मार्गदर्शक सदस्य दिलीपराव पाचंगे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार, परिचय व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी दत्तात्रय धोत्रे, वैभव जोशी, अंकुश गवळी, रामचंद्र धोत्रे, कलाशिक्षक सागर पाटसकर, सूत्रसंचालक विश्वकुमार घोडके  प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

           प्रमुख पाहुणे मंदार केसकर बोलताना म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या वास्तूत त्यांच्या आईच्या नावाने १९६२ साली उभारलेल्या "मातोश्री सखुबाई कन्या प्रशालेच्या" प्रांगणात राष्ट्रसंत गाडगे महाराजांचा समाजात कोणतेही कार्य करताना निस्वार्थीपणे गरजूंना मदत, काटकसरीने उभा राहणाऱ्या संस्था हा विचार यावर एक "बोधकथा" सांगून विद्यार्थिनींशी संवाद साधता आला. माझे वडील कै. मार्तंड केसकर यांचा एक मुद्रक या नात्याने प्रशालेशी अत्यंत स्नेह होता तो स्नेह आजच्या प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमामुळे माझ्यापर्यंत वृद्धिंगत झाला असे ते विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

            कार्यक्रमप्रसंगी प्रशालेचे प्रेरणादायी कार्य करणारे माजी मुख्याध्यापक जीवन पाटील, कै. सुभाष पाटसकर , कै. पु. द. आटपाडीकर सर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
          दिनांक 15 ऑगस्ट रोजी मा. आ. प्रशांतराव परिचारक यांचा वाढदिवस आहे. तदनिमित्त  पंढरपूर शहर व तालुक्यात वाढदिवसानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे वतीने देण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)