मसाप पंढरपूरच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्याख्यान
पंढरपूर (प्रतिनिधी) - अभिजात मराठी अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी सर्व समाजाने घ्यावी असे मत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूरचे प्रा. डॉ. रमेश शिंदे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा, पंढरपूर च्या वतीने अध्यापक विद्यालय, पंढरपूर येथे मराठी अभिजात भाषा सप्ताहानिमित्त "मराठी भाषेची अभिजातता" या विषयावर प्रा. डॉ. रमेश शिंदे मराठी विभाग प्रमुख कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर यांचे व्याख्यान गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वा.आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मसाप पंढरपूरचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे होते. या प्रसंगी बोलताना मराठी भाषेची थोरवी, प्राचीन समृद्ध वारसा, प्राचीन साहित्य, भाषेचे वय, स्वयंभूपणा, मराठी भाषेचा इतिहास, साहित्यिक योगदान, सांस्कृतिक वारसा, भाषेची व्याप्ती, विविधता याविषयी अनेक उदाहरणे देऊन सविस्तर विवेचन केले. मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे फायदे व समाजातील विविध घटकांची जबाबदारी, राजकीय परंपरा, संतांचे कार्य साहित्यिकांचे योगदान, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजभाषा कोष निर्माण करून आदर्श घालून दिला. संतानी केलेले कार्य, अनेक शिलालेखांचा अभ्यासपूर्ण उल्लेख, संतकवी, मौखिक परंपरा, संतांचे कार्य याविषयी अभ्यासपूर्ण मांडणी करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी मसाप विभागीय कार्यवाह कल्याणराव शिंदे, कार्याध्यक्ष अशोक माळी, कोषाध्यक्ष मंदार केसकर, डॉ.राजेंद्र जाधव, प्रा.भास्कर बंगाळे, माजी प्राचार्य हनुमंत लामकाने, प्रा. हरिदास, प्रा. जाधव, प्रा. गंगथडे, विद्यार्थी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व अध्यक्षीय निवड प्रा. गंगथडे यांनी केली प्रास्ताविक कल्याणराव शिंदे यांनी केले, आभार मंदार केसकर यांनी व्यक्त केले. प्रा.डॉ.हणमंत वाघमारे प्राचार्य अध्यापक विद्यालय पंढरपूर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

