सांगोला साखर कारखान्याचे ४ लाख गाळप उद्दिष्ट - आ. अभिजीत पाटील

0
सांगोला कारखान्यामुळे विठ्ठल कारखाना व विधानसभेच्या यशामध्ये मोठा वाटा - आ. अभिजीत पाटील
         सांगोला (प्रतिनिधी) - सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील धाराशिव साखर कारखाना संचलित सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा ११वा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी होमहवन पूजा सौ.शितल व महादेव उत्तम देठे (धोंडेवाडी) आणि सौ.दिपाली राहुल कांतीलाल हादगिणे (जैनवाडी) या दांपत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

          यावेळी प्रा. तुकाराम मस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की; एक सर्वसामान्य कुटुंबातील तरुण बंद पडलेले साखर कारखाने अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन सुरू करतो, पुन्हा तो चेअरमन होतो, शेतकऱ्याचे पोरगं थेट जनतेच्या आर्शीवादाने आमदार झाले असून हि किमया फक्त आमदार पाटील यांच्या माणुसकीने कमावलेल्या माणसांमुळे आहे. अनेक संस्थांमधील शेतकरी सभासद, कामगार, वाहतूक ठेकेदार यांचे आशीर्वाद मिळाले आहेत.

           यावेळी श्री. बापूसाहेब देहूकर महाराज म्हणाले की; अगदी कमी काळामध्ये अभिजीत आबा पाटील यांनी आपल्या कार्याचा आलेख चढता असून सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. माणसाने विश्वास संपादन केला की यश आपोआप मिळतं याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार अभिजीत पाटील असल्याचे देहूकर महाराज यांनी सांगितले.

         यावेळी माढ्याचे आमदार बोलताना म्हणाले की; सांगोला साखर कारखाना सुरू करत असताना अनेक संकट आली परंतू त्यातून मार्ग काढत गाळप यशस्वी केले. सांगोला साखर कारखान्याचे नाव पुन्हा एकदा नावारूपाला आणण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ काम करत आहे. सांगोला कारखान्यामुळे विठ्ठल कारखाना व विधानसभेच्या यशामध्ये मोठा वाटा असल्याचे सांगितले. कारखाना चालवताना असताना सर्व संचालक मंडळाची व अधिकाऱ्यांची प्रामाणिक भावना आहे. सन २०२५-२६च्या गाळपासाठी कारखान्याची कामे पूर्ण झाली आहेत. यंदा कारखान्याचे ४ लाख गाळपाचे उद्दिष्ट असून शेतकरी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. येत्या दिवाळी सणासाठी कामगारांना १५ दिवसाचा बोनस म्हणून बक्षीस आमदार पाटील यांनी जाहीर केले असून दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. 

          यावेळी प्रस्ताविक नितीन पवार यांनी केले असून धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी कार्यक्रमात आभार मानले.

           यावेळी सांगोला साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन विश्वनाथ चव्हाण, शहाजी नलवडे, तुकाराम जाधव, सदाशिव नवले, धाराशिव साखर कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे, रणजित भोसले, संदीप खारे, संजय खरात, सुरेश सावंत, विकास काळे, सुहास शिंदे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)