पंढरपूर (प्रतिनिधी) - माघ एकादशीनिमित्त जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या वतीने हिंदू धर्म रक्षण चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक 29 रोजी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूर नजिक भटुंबरे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकातील संत जनार्दन स्वामी आश्रम येथे सदर हिंदू धर्म रक्षण चर्चासत्र संपन्न होणार आहे.
या चर्चासत्रामध्ये स्वामी शांतिगिरी महाराज व राज्यभरातून आलेले कीर्तनकार महाराज मंडळी धर्म रक्षण या विषयावर चर्चा करणार आहेत. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत सदर चर्चा सत्र संपन्न होणार असून या उपस्थित राहण्याचे आवाहन रामानंदजी महाराज यांनी केले आहे.

