कर्मवीर महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

0
                 पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील रयत शिक्षण संस्थेच्या  कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींची आंतर विद्यापीठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा पंजाब येथील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

          महाविद्यालयातील कु. चंद्रिका बाबर (बी.एस्सी. भाग ३) आणि कु. निर्जला माळी (बी.एस्सी. भाग ३) या विद्यार्थिनींनी आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्यांची आंतर विद्यापीठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

           या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी दोनही विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार, प्रा. विठ्ठल फुले व मनोज प्रा. मनोज खपाले उपस्थित होते.
        या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व सेवक वर्गाने विद्यार्थिनींचे अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)