पंढरपूरात भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापना दिन उत्साहात संपन्न

0
भारतीय जनता पार्टी चा ४६ वा स्थापना दिन मा. आ. प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून साजरा 
​              पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त पंढरपूर भाजप कार्यालयात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
            ​यावेळी भारतीय जनता पार्टीच्या दिलेल्या निर्देशानुसार टिळक स्मारक येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालया समोर मा. आ. प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
             यावेळी बोलताना मा. आमदार प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा (BJP) स्थापना दिवस दरवर्षी ६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. ६ एप्रिल १९८० रोजी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाची स्थापना झाली. हा दिवस भाजपच्या राष्ट्रवादाच्या विचारधारेचा आणि देशसेवेचा गौरव म्हणून साजरा केला जातो. १९७५ च्या आणीबाणीनंतर १९७७ मध्ये अनेक विरोधी पक्ष एकत्र येऊन 'जनता पार्टी' स्थापन झाली. तथापि, 'दुहेरी सदस्यत्वाच्या' मुद्दयावरून ६ एप्रिल १९८० रोजी जनसंघाच्या नेत्यांनी वेगळे होऊन 'भारतीय जनता पक्ष' स्थापन केला आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. आज भाजपचे नेते व कार्यकर्ते यांनी आपापल्या घरावर भाजपचा ध्वज फडकवावा असे आवाहन केले. तसेच पक्षाने दिलेल्या विविध कार्यक्रमांद्वारे पक्षाचे विचार आणि ध्येय लोकांपर्यंत पोहोचवावेत. या निमित्ताने श्यामा प्रसाद मुखर्जी, पं. दीनदयाल उपाध्याय, आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या  योगदानाचे, पक्षाची ध्येय धोरणे सामान्य नागरिक व खेड्या पाड्यात वाड्या वस्त्यांवर, शहरात प्रत्येक वार्डा वॉर्डांत पोहचवावीत तसेच भारतीय जनता पक्षाचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे तसेच इतर महापुरुष यांची  जयंती साजरी करावी असे आवाहनही केले.
            यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रोहित पानकर, तालुका अध्यक्ष सुभाष मस्के, करकंब मंडल अध्यक्ष हर्षल कदम, महिला अध्यक्ष ज्योती शेटे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, पांडुरंग सहकारी कारखान्याचे व्हॉइस चेअरमन कैलास खुळे, पंचायत समिती सभापती शुभम आगवणे, गट नेते वासुदेव बडवे, सुजित कुमार सर्वगोड हे उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणून नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर यांनी काम पाहिले. यावेळी पंढरपूर मधील सर्व भाजप प्रेमी, सन्माननीय पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)