श्रीसंत तुकाराम महाराजांच्या नविन चांदीच्या पालखी रथ संकल्पनेत श्रीविठ्ठल रूक्मिणी नित्य दर्शन भक्तगणांचा सहभाग

0
"याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा"

             पंढरपूर (प्रतिनिधी) - श्रीसंत तुकाराम महाराजांच्या नविन चांदीच्या पालखी रथ संकल्पनेत श्रीविठ्ठल रूक्मिणी नित्य दर्शन भक्तगणांनी  लोकसहभाग व  लोक वर्गणीतुन श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या चांदीचा पालखी रथाच्या संकल्पनेमध्ये सहभागी होण्याचे भाग्य व या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य हे पंढरपूर येथील श्रीविठ्ठल रूक्मिणी नित्य दर्शन भक्तगण यांना मिळणार आहे. श्रीविठ्ठल रूक्मिणी नित्य दर्शन भक्तगण यांनी सर्वांनी मिळुन यथाशक्ती सहभाग घेत देणगी स्वरूपात 25001/- रू. जमवुन रविवार दि. 12/04/2026 रोजी श्रीक्षेत्र देहु येथे जाऊन श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान श्रीक्षेत्र देहु येथील संस्थेचे प्रमुख श्री. गणेशजी मोरे महाराज (विश्वस्त) यांच्याकडे रोख रक्कम 25001/- प्रदान करण्यात आली.
                या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य व हा उपक्रम राबवण्यासाठी श्रीविठ्ठल रूक्मिणी नित्य दर्शन भक्तगण पंढरपूर यांचे अनमोल सहकार्य या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य सर्वांना लाभले व सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)