देगाव येथे भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने शिबिराचे आयोजन

0
           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालूक्यातील देगाव येथे भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीने विविध शासकीय दाखल्यांसाठी शिबिराचे आयोजन काल करण्यात आले. यामध्ये एकूण 284 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी जिल्हाधिकारी करतेकेयन साहेब, तहसीलदार सचिन लंगोटे साहेब, इतर बहुजन कल्याण विभागाचे गणेशजी सोनटक्के साहेब, नायब तहसीलदार बालाजी पुदलवड साहेब, मंडळ अधिकारी चव्हाण साहेब, पुरवठा अधिकारी बादल साहेब, कोतालकर साहेब  यांचे सहकार्य लाभले. या शिबीरासाठी  भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धवजी काळे, राहुलजी चव्हाण, स्वामी धनगर, शरदजी मकर यांचे मार्गदर्शन लाभले.
            यावेळी सोलापूर जिल्हा अशासकीय समिती सदस्य व अभियान प्रमुख सुनिलजी पवार, पंढरपूर जिल्हा संयोजक प्रशांतजी सापणेकर, सुवर्णाताई पवार, विलास पवार आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 284 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)