सोलापूर दि. 31 (प्रतिनिधी) - येथील मंडप व्यवसायात पन्नास वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले एस. एम. पाटील मंडप कॉन्टॅक्टर शिवकुमार पाटील यांना यंदाच्या वर्षीचा स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण जीवन गौरव पुरस्कारने खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे सभागृहात आयोजित या कार्यक्रमास कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार शेखर आजगावकर, माजी आमदार राजीव आवळे, मंडप कॉन्टॅक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दगडूशेठ पुरोहित, कोल्हापूर जिल्हा मंडप असोसिएशनचे अध्यक्ष सागर चव्हाण यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडप व्यवसायात कार्यरत असलेल्या अनेकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सांगली, कोल्हापूर, पुणे, संभाजीनगर येथून या कार्यक्रमाला मंडप व्यवसायिक उपस्थित होते.
सोलापूरातील शिवकुमार पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

