माजी आमदार दत्तात्रय सावंत यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) -  2014 च्या पुणे शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पूर्वीपासून पुणे जिल्ह्यातील पाचही जिल्ह्यामधून शिक्षक मतदार संघामधून प्रत्येक शिक्षक व संस्थाचालकांची  भेट घेत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्या पाचही जिल्ह्यातील प्रचार फेरी मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्साहाने पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
            पुणे शिक्षक मतदार संघातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या जिल्ह्यामधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थाचालक हे दत्तात्रय सावंत यांना परिचित आहेत त्याचप्रमाणे त्यांनी आजपर्यंत केलेल्या शिक्षकांच्या कल्याणासाठी व त्यांच्या अनेक समस्या अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची जाणीव या शिक्षक वर्गाला असल्यामुळे गत पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी हे पाचही जिल्ह्यातील शिक्षक आतुर झाल्याचे दिसून येत आहेत.
         रासपाचे उमेदवार दत्तात्रय सावंत हे संपूर्णपणे शिक्षक मतदार संघामध्ये आपल्या प्रचार दौरा मध्ये अतिशय साध्या पद्धतीने कुठलाही लवाजमा न बाळगता प्रत्येक शिक्षकाच्या गाठीभेटी ते घेत आहेत. त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेत आहेत. दत्तात्रय सावंत यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन हे शिक्षक मतदार पुन्हा एकदा दत्तात्रय सावंत यांना महाराष्ट्र शासनाच्या दरबारी आमदार म्हणून पाठवण्यास उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
             शिक्षकांच्या हक्कांचा लढा आणि शैक्षणिक प्रश्नांची सोडवणूक या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवून सावंत यांनी प्रचाराची दिशा निश्चित केली असून, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण शिक्षक वर्गाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)