दिवाळीनिमित्त साखर कामगारांना १० किलो साखरेचे वाटप !

0
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, सहयोगी ओंकार शुगर कारखाना युनिट नं. १४, चंद्रभागानगर भाळवणी

दिवाळी सणाचे औचित्य साधून कारखान्यातील सर्व साखर कामगारांना प्रत्येकी १० किलो साखरेचे वाटप

          पंढरपूर (प्रतिनिधी) - ओंकार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील तसेच कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या हितासाठी नेहमीच विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत.

           कामगारांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबाची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उदात्त भावनेतून साखर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

             कामगारांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाबद्दल कारखाना व्यवस्थापनाचे सर्व कामगारांकडून मनःपूर्वक आभार व अभिनंदन होत आहे.

             कामगारांचे हित, कामगारांचा सन्मान आणि कामगारांच्या कुटुंबात आनंद निर्माण करणारे व्यवस्थापन, हीच खरी दिवाळीची भेट !

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)