पंढरपूर (प्रतिनिधी) - रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. धनंजय शिवाजी वाघदरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून इंग्रजी विषयातील विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
डॉ. वाघदरे यांनी 'प्रीती शेनॉय, समीना अली, आभा दावेसर आणि मंजू कपूर यांच्या निवडक कादंबऱ्यांमधील लिंगभाव, सत्ता आणि भाषा यांचा अभ्यास' या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यांच्या संशोधनासाठी कालिकादेवी महाविद्यालय, शिरूर कासार, जिल्हा बीड येथील प्रा. डॉ. रमेश अच्युतराव लांडगे यांनी संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
डॉ. वाघदरे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव किशोर राजेनिंबाळकर, सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे आणि मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून संशोधन कार्याचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनीही त्यांचे अभिनंदन केले. इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. समाधान माने, प्रा. डॉ. धनंजय साठे, प्रा. डॉ. सोमनाथ व्यवहारे आणि प्रा. कुबेर गायकवाड यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
डॉ. वाघदरे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

