महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

0
विठ्ठल सभामंडपात महाद्वार काला उत्साहात संपन्न

२८ नोव्हेंबर रोजी श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा
              पंढरपूर, दि. २६ : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या धार्मिक सोहळ्याची सांगता बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी पारंपरिक महाद्वार काला उत्सवाने झाली. श्रीविठ्ठल सभामंडप येथे महाद्वार काल्याचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
              श्री. हरिदास, नामदास महाराज, पुजारी तसेच विविध समाजबांधवांच्या सहभागातून हा पारंपरिक सोहळा पार पडला. यावेळी श्रीविठ्ठल सभामंडपात पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या व त्यानंतर दहीहंडी फोडून काल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. पुढे नामदेव पायरीमार्गे काल्याचे महाद्वाराकडे प्रस्थान झाले. यावेळी भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने या सोहळ्यात सहभाग नोंदविला.
               कार्तिकी यात्रेच्या कालावधीत श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील धार्मिक विधी, पूजा-अर्चा तसेच सर्व पारंपरिक प्रथा व परंपरांचे मंदिर समितीच्या वतीने काटेकोरपणे पालन करण्यात आले. यात्रेचा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला.

              यावेळी मंदिर समितीचे लेखाधिकारी श्री. मुकेश अनेचा, विभागप्रमुख श्री. संदीप कुलकर्णी यांच्यासह मंदिर समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

               कार्तिकी यात्रेच्या सांगतेनंतर आता शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी श्रीविठ्ठल व श्रीरुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा पारंपरिक धार्मिक विधीनुसार संपन्न होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. प्रवीणकुमार घम यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)